मुंबई : भारतीय शेअर बाजारात १४ जुलै रोजी घसरून पाहायला मिळाली. सेन्सेक्स २४७.०१ अंकांनी घसरून ८२,२५३.४६ वर बंद झाला, तर निफ्टी ६७.५५ अंकांनी घसरून २५,०८२.३० वर बंद झाला.जिओ फायनान्शियल, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, विप्रो, एशियन पेंट्स या निफ्टीमधील प्रमुख शेअर्समध्ये घसरण झाली तर इटरनल, टायटन कंपनी, इंडसइंड बँक, ओएनजीसी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स हे शेअर्स वधारले.
शुक्रवारच्या ८५.८० च्या तुलनेत सोमवारी भारतीय रुपया १९ पैशांनी घसरून ८५.९९ प्रति डॉलरवर बंद झाला. मागील सत्रात सेन्सेक्स ६८९.८१ अंकांनी घसरून ८२,५००.४७ वर बंद झाला, तर निफ्टी २०५.४० अंकांनी घसरून २५,१४९.८५ वर बंद झाला.