अहिल्यानगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले. सभासद शेतकऱ्यांबरोबरच छोट्या-मोठ्या घटकांच्या उत्कर्षाचा मार्ग सहकारातून जातो. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतले, तरी येथील मातीशी असलेली नाळ कधी सोडली नाही. संजीवनी नावाचे वैभव त्यांनी उभे केले. भविष्यातील बदल, तंत्रज्ञान, प्रगल्भता आणि त्यतून नवनवीन निर्माण होणारी आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी युवानेते विवेक कोल्हे व त्यांचे सर्व संचालक मंडळ कार्यरत आहे असे प्रतिपादन कोल्हे यांनी केले.
कार्यक्रमात व्यक्तिमत्व विकास केंद्राचे संस्थापक अभियंते गोपी गिलबिले म्हणाले की, सहकार हा जगाचा आत्मा आहे. सहकारातून अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या. विकास रूपी संस्था उभ्या राहिल्या. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी परिसराबरोबरच राज्याचे सहकारवैभव देशात नावारूपाला आणले. यावेळी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे व साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी स्वागत केले. अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, विश्वास महाले, त्र्यंबकराव सरोदे, ज्ञानदेव औताडे, बाळासाहेब वक्ते, सतीश आव्हाड, रमेश घोडेराव, ज्ञानेश्वर होन, बाळासाहेब पानगव्हाणे, संजय औताडे, ज्ञानेश्वर परजणे, मानव संसाधन विभाग प्रमुख विशाल वाजपेयी, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सचिव तुळशीराम कानवडे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले.