शेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स ३१७ अंकांनी वधारला, निफ्टी २५,२०० च्या जवळ

मुंबई : भारतीय शेअर बाजार निर्देशांक १५ जुलै रोजी मजबूत पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ३१७.४५ अंकांनी वधारून ८२,५७०.९१ वर बंद झाला, तर निफ्टी ११३.५० अंकांनी वधारून २५,१९५.८० वर बंद झाला.हिरो मोटोकॉर्प, सन फार्मा, बजाज ऑटो, अपोलो हॉस्पिटल्स, श्रीराम फायनान्स हे शेअर्स वधारले तर एचसीएल टेक्नॉलॉजीज, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, इटरनल आणि टाटा स्टीलमध्ये घसरण पाहायला मिळाली. मंगळवारच्या बंदच्या तुलनेत भारतीय रुपया १८ पैशांनी वधारून ८५.८१ प्रति डॉलरवर बंद झाला. मागील सत्रात सेन्सेक्स २४७.०१ अंकांनी घसरून ८२,२५३.४६ वर बंद तर निफ्टी ६७.५५ अंकांनी घसरून २५,०८२.३० वर बंद झाला होता.

बीएसई मिडकॅप निर्देशांकात ०.८३ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात ०.९५ टक्के वाढ दिसून आली.बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप मागील सत्रातील ४५७.६ लाख कोटी रुपयांवरून ४६० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यामुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात २ लाख कोटी रुपयांचा नफा झाला. मंगळवारी सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. निफ्टी कॅपिटल मार्केटमध्ये सर्वाधिक २.१० टक्के वाढ झाली. त्यानंतर, निफ्टी ऑटो १.५० टक्के, निफ्टी फार्मा १.१४ टक्के, निफ्टी रिअॅलिटी ०.७९ टक्के, निफ्टी एफएमसीजी ०.७२ टक्के, निफ्टी मीडिया ०.४८ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅस ०.४८ टक्के वाढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here