बेळगाव : हालसिद्धनाथ कारखान्याचे मार्गदर्शक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, ऊस उत्पादक सभासदांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शेतकरी, सभासद आर्थिकदृष्टी सक्षम होण्यासाठी कारखान्याकडून ऊस विकास योजना सुरू केली आहे. मागील तीन वर्षांपासून खते, लागवडीसाठी सभासदांना एकरी दहा हजार रुपये बिनव्याजी दिले जात आहेत. शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुपिकतेसाठी नॅनो युरिया, नॅनो डीएपी अशा अद्यावत खतांच्या मात्रेचा अवलंब करावा आणि ऊस उत्पादकांनी नॅनो तंत्रज्ञान राबवावे, असे आवाहन हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील यांनी केले. अंमलझरी (ता. (निपाणी) येथे कारखान्याकडून आयोजित ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कमी श्रमात, कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शिवाजी खोत यांनी स्वागत केले. सत्तू गावडे यांनी सभासदांच्या मुलांना स्कॉलरशिप, कामगार व सभासदांसाठी विमा वाटप, अपघाती मृत्यू विमा अशा नवनवीन योजना जोल्ले दाम्पत्याच्या दूरदृष्टीतून राबविल्या आहेत असे सांगितले. कारखान्याला ऊस पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. संचालक जयवंत भाटले यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक राजू गुंदेशा, सिद्धराम पुजारी, सोमराय यमगर, रवी कदम, सिद्धगोंडा बाडकर, सचिन कुंभार, परशुराम पुजारी, संजय खोत, शरद बन्ने, महादेव चेंडके, आदेश मुरगुंडे, सचिन पोवार, अप्पासाहेब पाटील, वसंत पाटील, नितीन घस्ते, काका पाटील आदी उपस्थित होते.