लखनौ: साखर कारखान्याकडून उसाची बिले वेळेत न दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. माजी मंत्री चेतराम यांचे नातू आणि केंद्रीय बाल कामगार मंडळाचे सदस्य भुजेंद्र गंगवार यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. नवाबगंज परिसरातील शेतकरी ओसवाल साखर कारखाना आणि बरखेडाच्या बजाज साखर कारखान्याला ऊस पुरवतात. दोन्ही कारखान्यांनी येथील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकविल्याचे शेतकऱ्यांनी योगी यांना सांगितले.
साखर कारखाने वेळेवर पैसे देत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. शेतकऱ्यांना विविध आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी कारखान्यांना लवकरात लवकर ऊस बील देण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना लवकरात लवकर पैसे देण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. याशिवाय, हाफिजगंज, सेंथल-जोदूपूर रस्त्याचे नाव चेतराम मार्ग असे दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.