ऑगस्ट २०२५ साठी २२.५ लाख टन साखर कोटा जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने सोमवारी ऑगस्ट २०२५ साठी २२.५ लाख मेट्रिक टन मासिक साखर कोटा जाहीर केला. हा कोटा ऑगस्ट २०२४ मध्ये वाटप केलेल्या कोट्यापेक्षा कमी आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये, सरकारने देशांतर्गत विक्रीसाठी २२ लाख मेट्रिक टन मासिक साखर कोटा दिला होता. जुलै २०२५ साठी साखर कोट्याचे वाटपदेखील २२ लाख मेट्रिक टन होते.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, मागणी वाढल्यामुळे जुलैमध्ये साखरेच्या किमतीत प्रति क्विंटल १०० रुपयांची वाढ झाली. रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, श्रावण इत्यादी सणांमुळे ऑगस्टचा कोटा अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येते; त्यामुळे बाजारात साखरेच्या किमती १०० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये साखरेचा वापर २५.२० लाख मेट्रिक टन होता. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या गणेशोत्सवामुळे बाजारात साखरची मागणी वाढणार असल्याने दराचा गोडवा तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here