सोलापूर : लोकमंगल शुगर्सच्या ३ कारखान्यांपैकी भंडारकवठे येथील लोकमंगल शुगर इथेनॉल ॲड को-जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २७०० तर १० जानेवारीपासून २८०० दर दिलेला आहे. यंदा लोकमंगलचे दहा लाख मेट्रिक टनाचे ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कारखान्याचे संचालक पराग पाटील यांनी सांगितले.
लोकमंगल शुगरचा रोलर पूजन कार्यक्रम गुरुवारी भंडारकवठेत कारखानास्थळी झाला. यावेळी शेतकी अधिकारी दीपक नलावडे, गजानन रुद्रमठ, गुणान शेखरन, किशोरकुमार जोशी, अमोल म्हमाणे, कपिल सिंदखेडे, राजेंद्र पुजारी, नंदकिशोर कदम, विवेक पवार, महादेव कदम, ओंकार माळी, दिलीप गोरे, तानाजी पवार, इकबाल शेख, संतोष रेवतगाव, श्रीशैल लोखंडे आदी उपस्थित होते.