मुंबई : भारतीय बेंचमार्क निर्देशांक १ ऑगस्ट रोजी नकारात्मक पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ५८५.६७ अंकांनी घसरून ८०,५९९.९१ वर बंद झाला, तर निफ्टी २०३.०० अंकांनी घसरून २४,५६५.३५ वर बंद झाला. सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब्स,अदानी एंटरप्रायझेस, टाटा स्टील, सिप्लामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. तर ट्रेंट, एशियन पेंट्स, हिरो मोटोकॉर्प, एचयूएल, नेस्ले या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.
शुक्रवारी भारतीय रुपया ८७.५२ प्रति डॉलरवर वधारला, तर गुरुवारी ८७.६० वर बंद झाला होता. मागील सत्रात, सेन्सेक्स २९६.२८ अंकांनी घसरून ८१,१८५.५८ वर बंद झाला, तर निफ्टी ८६.७० अंकांनी घसरून २४,७६८.३५ वर बंद झाला होता.