जालना : छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाड ग्रामीण विकास संस्था व उसतोड कामगार आरोग्य व पोषण खात्रीशीर सेवा प्रकल्पांतर्गत परतूर घनसावंगी तालुक्यातील ३० गावांतील हंगामी स्थलांतर कुटुंबांना आरोग्य पोषन मिळाले. त्यासाठी त्याना किचन गार्डन किट वाटप करण्यात आली. पुन्हा नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी परसबाग संकल्पना चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. ऊसतोड कामगारांसाठी संस्थेने मोफत बियाणे उपलब्ध करून दिले आहे.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक आप्पासाहेब उगले, जिल्हा संपर्क अधिकरी भाऊसाहेब गुंजाळ, प्रकल्प व्यवस्थापक अश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परतूर आणि घनसावंगी तालुक्यातील ३० गावात उसतोड कामगारांना परसबागेचे महत्त्व सांगण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यात पसरबागेचे चांगले काम दिसून येत आहे.
घनसावंगी तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या घरासमोर परसबागा बहरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी प्रशिक्षक तथा जिल्हा समन्वयक एकनाथ राउत, सुरेखा वाघमारे, राजेश वाघमारे, अजय गाढे, आकाश चौगुले योगेश आढे, महादेव खरात आदी परिश्रम घेत आहेत. पूर्वी जुन्या काळात घराच्या परिसरात सांडपाण्यावर भाजीपाला घ्यायची पध्दत होती. कुडाच्या शेजारी वेलवर्गीय मुळा, कारले, मिरची, लसूण आदी भाजीपाला घेतला जात असे. आता मात्र, रासायनिक पध्दतीने पिकविलेल्या भाजीपाल्यातून आजार बळावण्याची दाट शक्यता असल्याने परसबाग फुलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून ताजी आणि पौष्टिक भाजीपाला मिळेल अशी अपेक्षा आहे.