सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचीही ऊस शेतीला पसंती

सातारा : सातारा जिल्ह्यात एकूण १७ साखर कारखाने आहेत. यंदा सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करतील. कारण जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातही यंदा गाळपाच्या ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा गाळपासाठी जिल्ह्यात एकूण १ लाख १४ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. बंधारे निर्मिती आणि चांगले पर्जन्यमान यामुळे जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा कलही या पिकाकडे वाढला आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होईल. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेतले जातात. यामध्ये बाजरी, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, मका, गहू, हरभरा आदी मुख्य पिके घेतली जातात. पण, जिल्ह्यात उसाचेही क्षेत्र वाढत आहे. यंदाच्या हंगामात गाळपासाठी १ लाख १४ हजार ७२५ हेक्टर क्षेत्र राहील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात १ लाख १४ हजार ५७ हेक्टर क्षेत्र राहणार आहे. हे प्रमाण ९९ टक्के आहे. अनेक योजनांचे पाणी दुष्काळी तालुक्यात पोहोचले आहे. त्यामुळे ऊस लागवड वाढत आहे. यंदाच्या हंगामात रास्त आणि चांगला दर मिळाल्याशिवाय उसाच्या कांडक्याला कारखानदारांना हात लावू देणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here