साखर कारखान्यांचा इथेनॉल उत्पादनाकडे कल

नवी दिल्ली: इथेनॉलची प्रदूषणविरहित इंधन अशी असणारी लोकप्रियता आणि गेल्या काही वर्षांत अतिरिक्त साखर उत्पादनामुळे भारतीय साखर कारखान्यांचा कल इथेनॉल उत्पादनाकडे वाढला आहे.

ब्राझिलमध्ये साखरेची किंमत 22 रुपये प्रति किलो आहे तर भारतात तीच किंमत 32 ते 34 रुपये प्रति किलो आहे. म्हणूनच, जागतिक बाजारपेठेत कोणीही भारतीय साखर विकत घेण्यास तयार नाही आणि याचा परिणाम म्हणून भारताचे नुकसान होत आहे. अतिरिक्त साखरेच्या उत्पादनात घट होण्यासाठी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) मतानुसार आतापर्यंत 29.5 कोटी लिटर इथेनॉल तेल उत्पादनांच्या कंपन्यांना पुरविण्यात आले आहे. आणि हे जवळजवळ 3 लाख टन साखरेच्या समान आहे. या कंपन्यांनी 51 करोड लिटर इथेनॉल पुरवण्याची ऑफर दिली आहे, ज्यामुळे साखर उत्पादन 5 लाख टन कमी होईल.

अतिरिक्त साखर उत्पादन कमी करणे शक्य नाही आणि पीक पध्दती बदलणे देखील कठीण आहे तसेच उसाच्या रसापासून साखर किंवा इथेनॉल तयार करण्यासाठी सरकारकडून साखर कारखान्यांना भाग पाडले जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारने निरंतर, पारदर्शी आणि दीर्घकालीन इथेनॉल खरेदी धोरण तयार केले आहे. देशातील इथेनॉल अर्थव्यवस्था 11,000 कोटी रुपये असून पुढील दोन वर्षांत ती 50,000 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here