सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या जत-तिप्पेहळ्ळी युनिटमध्ये कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलकार, रघुनाथ भिसे, चीफ केमिस्ट एन. एम. जगताप, ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची दूरदृष्टी अथक प्रयत्नातून जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यातून तालुक्यातील उसाचे प्रमाणही वाढले आहे. सर्वांच्या सहकार्याने राजारामबापू पाटील साखर कारखाना या गळीत हंगामात निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वास मला वाटतो.
कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी यंदा गळीत हंगाम यशस्वी करण्यास सर्वांनी सहकार्य करावे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस पुरवठा करावा असे आवाहन केले. ते म्हणाले की, यंदा जत तालुक्यात पाऊस चांगला झाला आहे. आमदार जयंतराव पाटील जलसंपदा मंत्री असताना जत तालुक्यातील सर्व योजनांना गती दिली. त्यामुळे पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने उसाच्या लागवड क्षेत्रातही वाढ झाली आहे. यावेळी चीफ केमिस्ट एन. एम. जगताप यांनी आभार मानले. केमिस्ट प्रमोद आरळी, सुरेश पाटील, रत्नाकर शिंदे, असिस्टंट इंजिनिअर प्रतीक मोरे, अजित विभूते, निकील गावडे, संदीप जाधव, सुदर्शन चव्हाण, पंकज पाटील, मुख्य लेखापाल श्रीनिवास कुंभार, शरद पाटील आदी उपस्थित होते.