सोलापूर : लोकशक्ती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. या कारखान्याकडून जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर दिला जाईल, असे आश्वासन चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद (मंद्रूप) येथील लोकशक्ती साखर कारखान्याचे सोमवारी मिल रोलर पूजन डॉ. अमोल पाटील व नीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खोराटे बोलत होते.
खोराटे म्हणाले की, लोकशक्ती साखर कारखाना अथर्व ग्रुप ऑफ कंपनीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कमी कालावधीमध्ये हा साखर कारखाना चालवण्यासाठी येथील कर्मचारी करत आहेत. ऑक्टोबरमध्ये साखर कारखान्याचा गाळपाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त ऊसदर देणार आहोत. तसेच कारखान्यास ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना ऊसबिल वेळेवर मिळणार आहे. ऊस वजन काटा व्यवस्थित असेल. शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात कारखाना सुरू होणार असल्याचे चेअरमन खोराटे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. अमोल पाटील, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन केले. शुभारंभ कार्यक्रमासाठी कारखान्याचे पृथ्वीराज खोराटे, कारखान्याचे प्रवर्तक मनोहर डोंगरे, माजी सभापती विजयराज डोंगरे, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, भाजपचे नेते डॉ. चनगोंडा हविनाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी काशीनाथ शेटे, सिव्हिल इंजिनिअर मुकुंद पाटील, सिद्धेश्वर शिंदे, नरेश रामपुरे, बाळासाहेव गायकवाड, शेतकी अधिकारी राजाराम पवार, शाम भोईटे, अखिलेश बीटे, चंद्रकांत राठोड, बाजार समितीचे संचालक नागाण्णा बनसोडे यांच्यासह औराद, मंद्रूप, भंडारकवठे, मोहोळ, कामती कोरवली, टाकळी, नांदणी, निम्बर्गी, विंचूर गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, सोसायटी सदस्य, प्रगतिशील शेतकरी, उद्योजक, सर्व खाते प्रमुख, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.