सातारा : पाडेगाव ऊस केंद्रातील विकास कामांसाठी ४०.९१ कोटींचा निधी मंजूर

सातारा : फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि अतिथीगृह विकासासाठी राज्य सरकारने ४०.९१ कोटी रुपये निधीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात नवी प्रशासकीय इमारत, कर्मचारी निवासस्थान, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, अतिथिगृहाचा समावेश आहे. येथील केंद्रावर दरवर्षी अनेक शेतकरी, शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी भेट देतात. मात्र, त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आणि अतिथीगृहाची सुविधा नाही. शासनाने शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि अतिथीगृहाच्या बांधकामासाठी १४.८६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल आणि अधिकाऱ्यांची राहण्याची सोय होईल.

पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राची प्रशासकीय इमारत ९३ वर्षे जुनी आहे. आता १४.९३ कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. कर्मचारी निवासस्थानासाठी ११. १२ कोटी मंजूर झाले आहेत. केंद्राने गेल्या अनेक दशकांपासून ऊस शेतीच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. केंद्राने उसाच्या १७ सुधारित जाती प्रसारित केल्या असून, जास्त उत्पादन आणि साखरेचा उतारा देणाऱ्या जातींची निर्मिती केली आहे. या विकास कामांमुळे ऊस संशोधन केंद्राला नवसंजीवनी मिळणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here