तामिळनाडू : राज्य सरकारने तिरुमंडनकुडी साखर कारखान्याचे राष्ट्रीयीकरण करण्याची मागणी

तंजावर : न्यू डेमोक्रॅटिक लेबर फ्रंट (एनडीएलएफ) ने तंजावर जिल्ह्यातील तिरुमंडनकुडी येथील खाजगी व्यवस्थापनाखाली चालवल्या जाणाऱ्या साखर कारखान्याचा ताबा घेण्याची मागणी राज्य सरकारला केली. या मागणीसाठी ‘एनडीएलएफ’ने १६ ऑगस्ट रोजी तंजावरमध्ये निदर्शने केली. यावेळी आंदोलकानी साखर कारखान्याच्या माजी खाजगी व्यवस्थापनाने बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर बँक कर्ज घेतल्याबद्दल निषेध केला.

“बेकायदेशीरपणे” घेतलेले कर्ज आणि सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज व्याजासह माफ करण्याचे आवाहन आंदोलकांनी राज्य सरकारला केले. त्यांनी राज्य सरकारने कारखाना ताब्यात घ्यावा अशी मुख्य मागणीदेखील केली. या निषेध आंदोलनात सीपीएमएल पीपल्स लिबरेशन, लेफ्ट कॉमन प्लॅटफॉर्म, तामिळनाडू कावेरी शेतकरी संरक्षण संघटना, थमीझागा विवसायगल संगम, थमीझा देसा मक्कल मुन्नानी, मक्कल कलई इयक्किया कझगम, मक्कल अधिकारम आणि मार्क्सवादी पेरियारिस्ट आंबेडकर फेडरेशनच्या सदस्यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या कार्यवाहीच्या माध्यमातून पुदुकोट्टई स्थित डिस्टिलरी कंपनीने ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्याचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या एनडीएलएफच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here