ब्राझील : इथेनॉल बाजारात पुन्हा प्रवेशासाठी ‘रायझेन’मध्ये गुंतवणुकीचा ‘पेट्रोब्रास’चा विचार

साओ पाउलो : ब्राझीलची सरकारी मालकीची तेल कंपनी पेट्रोब्रास साखर आणि इथेनॉल उत्पादक रायझेनमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. स्थानिक वृत्तपत्र ओ ग्लोबोने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या निर्णयामुळे पेट्रोबासचा इथेनॉल बाजारात पुन्हा प्रवेश करण्याचा एक नवीन मार्ग मोकळा होणार आहे, असे यामध्ये म्हटले आहे. पेट्रोब्रासने २०१७-२०२१ च्या धोरणात्मक योजनेत जैवइंधनाचे उत्पादन थांबवण्याची घोषणा केल्यानंतर यापूर्वी इथेनॉल क्षेत्रात परतण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. तर रायझेनला सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि ते नवीन भागीदारासाठी तयार आहेत.

ओ ग्लोबोमधील वृत्तानुसार, पेट्रोब्रास चालू वर्षाच्या अखेरीस निर्णय घेऊ शकते. तेल कंपनी रायझेनमध्ये भागीदार म्हणून सामील होणे किंवा कंपनीकडून मालमत्ता खरेदी करणे यांसह अनेक पर्यायांवर विचार केला जात आहे, असे अहवालात म्हटले आहे. जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि आघाडीचा इथेनॉल उत्पादक रायझेन शेल आणि ब्राझिलियन ग्रुप कोसान यांच्या नियंत्रणाखाली आहे. कंपनीचे इंधन वितरण क्षेत्रातही व्यवसाय आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीला रायझेनने कमकुवत निकालांची नोंद केल्यानंतर नवीन शेअरहोल्डरची शक्यता मान्य केली. त्यामुळे त्यांचे शेअर्स विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले. कोसनने म्हटले आहे की, “कंपनीसाठी नवीन भागीदार आणणे हा आम्हाला आवडणारा पर्याय आहे. रायझेनला ऑपरेशनल आव्हाने आणि मोठ्या कर्जाचा सामना करावा लागत आहे. कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी अलिकडच्या उपाययोजनांमध्ये विनिवेश आणि एक मोठा कारखाना बंद करणे समाविष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here