बीड : अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना १ कोटी ९० लाखांची मदत

बीड : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची सानुग्रह अनुदान योजना १० ऑक्टोबर २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या अंतर्गत बीड जिल्ह्यातील ३८ अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना दिलासा देण्यात आला आहे. महामंडळातर्फे २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये एकूण १ कोटी ९० लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली.

राज्यात सुमारे ८ ते १० लाख ऊसतोड कामगार कार्यरत आहेत. यातील बहुतांश कामगार मराठवाडा पट्ट्यातील बीड, अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातून येतात.ऊसतोड कामगारांचे प्रश्नऊसतोडणी आणि वाहतुकीदरम्यान वारंवार अपघात होत असल्याने कामगारांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना घडतात. अशा वेळी कुटुंबाचे उत्पन्न थांबते आणि उपजीविकेवर मोठा परिणाम होतो. हे टाळण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. या अंतर्गत झोपडीला आग व सामग्री जळाल्यास १०,००० रुपये, वैयक्तिक अपघात (मृत्यू) २,५०,००० रुपये, वैयक्तिक अपघात (अपंगत्व) २,५०,००० रुपये, वैद्यकीय खर्च (अपघात) ५०,००० रुपये, बैलजोडी लहान (मृत्यू/अपंगत्व) ७५,००० रुपये, बैलजोडी मोठी (मृत्यू/अपंगत्व) १,००,००० रुपये असे सानुग्रह अनुदान दिले जाते. या योजनेमुळे अपघातानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना आधार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here