सांगली : आदिनाथ कारखाना उभा करण्यासाठी माझे वडील कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी २३ वर्षे पायात चप्पल घातली नाही. त्यांनी कारखाना उभा करण्यासाठी जे कष्ट घेतले त्याची जाणीव ठेवून आदिनाथ कारखाना चालू करण्याचे आव्हान आपण स्वीकारले आहे अशी घोषणा आमदार नारायण पाटील यांनी केली. जेऊर येथे आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील होते. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर ज्यांची ज्यांची सत्ता आली, त्या प्रत्येकाने या कारखान्याची काय अवस्था करून ठेवली आहे. आपण सर्वजण पाहत आहोत अशी टीकाही त्यांनी केली.
आमदार पाटील म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे माझे वर विशेष प्रेम असून त्यांची तब्येत बरी नसताना देखील माझ्या वाढदिवसानिमित्त मला आशीर्वाद देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहिले. कार्यक्रमाला ‘आदिनाथ’चे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले, शंभूराजे जगताप, संचालक नवनाथ झोळ, सविताराजे भोसले, डॉ. सतीश सुराणा, गहिनीनाथ ननवरे, बप्पा पाटील, पोपट पाटील, अॅड. राहुल सावंत, दादासाहेब पाटील, सुनील सावंत, अतुल पाटील, मनोहर भोसले, दत्ता सरडे, संजय पाटील-घटणेकर, संतोष वारे आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सुनील तळेकर, विनोद गरड यांनी सूत्रसंचलन केले. माजी सरपंच अनिलकुमार गादिया यांनी आभार मानले.