पुणे : राजुरी (ता. जुन्नर) येथील श्री हनुमान देवस्थान ट्रस्टच्या चावडीवर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच प्रिया हाडवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे कि, सभेत गावातील प्रस्तावित जुन्नर शुगर लिमिटेड डिस्टिलरी प्रकल्पास स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविण्यात आला. यावेळी प्लॅस्टिक बंदी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनेवर चर्चा करण्यात आली.
सभेत साखर कारखान्यामुळे परिसरातील निसर्गसंपदा, कृषी अर्थव्यवस्था आणि स्थानिक ग्रामस्थांच्या जीवनशैलीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राजुरी हे गाव बिबट्या प्रवण क्षेत्रात मोडत आहे. येथे बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असून, वन विभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, असे सांगण्यात आले.
प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्यामुळे शेतीसाठी असलेला जलस्रोत प्रभावित होण्याची शक्यता आहे. तसेच ऊस लागवड व अन्नधान्य पिकांवरील परिणाम होणार असल्याचे ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी सभापती दीपक औटी, उपसरपंच माऊली शेळके, एम.डी. घंगाळे, एकनाथ शिंदे, ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब औटी, मुरली औटी, चंद्रकांत जाधव, शाकीर चौगुले, रंगनाथ औटी, सखाराम गाडेकर, मीना औटी, सुप्रिया औटी, राजश्री रायकर, निर्मला हाडवळे, सुवर्णा गटकळ, रूपाली औटी, शीतल हाडवळे, ग्रामविकास अधिकारी संदीप ढोरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.