सोलापूर : करमाळा तालुक्यातील विहाळ येथील शिवगिरी ग्रो शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या मिल रोलरचे गुरुवार दि. ४ रोजी पूजन करण्यात आले. कारखान्याचे जेष्ठ संचालक कालिदास सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शिवगिरी आणि राजवी ग्रो शुगर लिमिटेडचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले. यावेळी या गळीत हंगामात साडेपाच लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. गळीत हंगाम १५ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असल्याची घोषणा चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केली.
चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले की, हा गळीत हंगाम १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू होणार आहे. या दृष्टीने कारखान्याची मशिनरी दुरुस्तीची कामे, तोडणी वाहतूक यंत्रणा आदी कामे युद्ध पातळीवर सुरू असून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर बॉयलर प्रदीपन करण्यासाठी कारखाना सज्ज होणार आहे. कार्यक्रमाला शिवगिरी शुगरचे संचालक किरण सावंत, संजय सावंत, पृथ्वीराज सावंत, अजिंक्य सावंत, सचिन तोडकरी, ऊस उत्पादक संदिपान सरडे, भारत मारकड, सागर टकले, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख, मुख्य शेतकी अधिकारी राजाभाऊ खटके, चीफ केमिस्ट पुंडलिक सांगळे, चीफ अकौंटंट राहुल तांबे, स्टोअर कीपर देवराव राठोड, टाईम कीपर भाऊराव गोडगे, सुरक्षा अधिकारी आझाद शेख आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी आभार मानले.