सातारा : कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचा १५ वा बॉयलर प्रदीपन कार्यक्रम उत्साहात झाला. प्रारंभी कारखान्यातील कर्मचारी नीलेश निकम, त्यांच्या पत्नी मनीषा निकम यांच्या हस्ते धार्मिक विधी झाले. जयवंत शुगर्सचे अध्यक्ष चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर आदींच्या प्रमुख उपस्थितीत विनायक भोसले यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन करण्यात आले. आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
चालू गळीत हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी ‘जयवंत शुगर्स’चे टेक्निकल विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर ए. बी. खटके, वर्क्स मॅनेजर एच. एम. नदाफ, प्रॉडक्शन मॅनेजर बी. जी. चव्हाणके, चीफ फायनान्स ऑफिसर बी. के. वाडेकर, सिव्हिल इंजिनिअर संजय जगदाळे, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य प्रशासकीय अधिकारी आर. टी. शिरसाट, डिस्टिलरी मॅनेजर व्ही. जी. म्हसवडे, ए. एल. काशीद, पी. एस. जाधव, जी. एस. बाशिंगे, सुरक्षा अधिकारी व्ही. टी. भोसले यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.