सोलापूर : स्वस्त दरात २०० पोती साखर देण्याच्या आमिषाने अज्ञात संशयिताने दुकानदाराची सुमारे तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आगळगाव येथे हा प्रकार घडला. याबाबत संताजी विजय जाधव (४५, रा. आगळगाव, धनगरवाडी) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संताजी जाधव यांनी आसळगाव येथे नवीन किराणा दुकान सुरू केले आहेत. ते मुलाला नेण्यास बार्शी बस स्टँडवर आले होते. तेथे दोन अनोळखी व्यक्ती साखर स्वस्तात विक्री बोलत होत्या. त्यावेळी जाधव यांनी माझ्या दुकानात विक्रीसाठी स्वस्तात साखर मिळेल का ? अशी विचारणा केली. त्यावेळी त्या संशयितांनी त्यांना बार्शीत बोलवून एका किराणा स्टोअर्समधून ७२०० रुपये घेऊन प्रथम २ क्विंटल साखर घेऊन गेला. विश्वास निर्माण करून २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत फोन करून २०० पोती साखर आहे. माल खरेदी करा. त्यात एक लाख रुपयांचा फायदा होईल, असे सांगीतले. साखरेची पोती टेंपोत भरल्यानंतर अज्ञात संशयित ३ लाख रुपये घेऊन तेथून टेम्पोसह पसार झाला.