लखीमपूर खिरी : अजबापूर साखर कारखाना परिसरातील छट्टापूर गावातील रहिवासी ज्योती प्रकाश सिंग यांनी प्रति हेक्टर २५०९ क्विंटल उत्पादन घेऊन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर ओसरी येथील संत कुमार वर्मा यांनी प्रति हेक्टर २४४१.५० क्विंटल उत्पादन घेऊन दुसरे स्थान पटकावले. लोणी मिल परिसरातील उधरणपूर गावातील अनुराग शुक्ला यांनीही २०११ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादनासह तिसरे स्थान पटकावले.
उसाचे हे भरघोस उत्पादन विज्ञान, तंत्रज्ञान आणि हवामानावर आधारित नियोजित शेतीचा परिणाम आहे. वैज्ञानिक शेती पद्धती आणि कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून हे यश मिळाले असल्याचे विजेत्या शेतकऱ्यांनी सांगितले. विजेत्या शेतकऱ्यांशी बोलताना, डीसीएम श्रीराम ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोशन लाल तमक म्हणाले, ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. हा ग्रुप जास्त उत्पादन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात फील्ड डे कार्यक्रमदेखील आयोजित करत आहे.