सांगली : सोनहिरा कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रतिटन ८० रुपयांचा हप्ता मिळणार

सांगली: डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्याने आतापर्यंत गळितास आलेल्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये दर दिला आहे. आता आणखी प्रतिटन ८० रुपये दिवाळीपूर्वी वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार विश्वजित कदम यांनी दिली. वांगी येथे कारखान्याच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखान्याने २०२४-२५ या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन ३२८० रुपये अंतिम दर जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हंगामात उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ‘डॉ. पतंगराव कदम ऊसभूषण’ तसेच गुणवंत कर्मचाऱ्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी आमदार कदम म्हणाले की, माजी आमदार मोहनराव कदम यांनी कारखाना प्रगतिपथावर नेण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने राज्य व देशपातळीवरील २६ पुरस्कार मिळविले आहेत. ‘एआय’ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी कारखान्याने पुढाकार घेतला आहे. कार्यकारी संचालक शरद कदम यांनी अहवाल व नोटीस वाचन केले. उपाध्यक्ष दिलीप सूर्यवंशी, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, संचालक रघुनाथराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जयसिंगराव कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, जितेश कदम, संचालक दीपक भोसले, दिग्विजय कदम, भीमराव मोहिते, सुरेश थोरात, तानाजीराव शिंदे, सयाजीराव धनवडे, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here