बिहार : गोपालगंज जिल्ह्यात यंदा चाळीस हजार एकर क्षेत्रात ऊस लागवडीचे उद्दिष्ट

गोपालगंज : यंदा जिल्ह्यातील पूर्वांचल प्रदेशात ४० हजार एकर जमिनीत ऊस लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सिधवालियाच्या भारत साखर कारखान्याच्या ऊस विभागाचे अधिकारी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहेत. कार्यकारी अध्यक्ष विकास चंद्र त्यागी यांनी सांगितले की, पुढील गळीत हंगामात जास्तीत जास्त साखर उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक केले जाईल. यावर्षी ऊस उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्के कमी असल्याचे सांगितले जात आहे. साखर कारखान्यात २०२५-२६ चा गाळप हंगाम फक्त तीन महिने चालेल अशी अशी शक्यता आहे. मात्र, आगामी गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये उसाचे विक्रमी गाळप करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

कारखान्याचे कार्यकारी उपाध्यक्ष संजीव कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली, साखर कारखान्याच्या राखीव आणि राखीव नसलेल्या क्षेत्रात शरद ऋतूतील ऊस लागवड १५ दिवस आधीच सुरू झाल्या आहेत. कारखान्याचे अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देत आहेत. नवीन यांत्रिक पद्धतींचा वापर करून लागवडीची सोय करत आहेत. यासाठी प्रगत बियाण्यांच्या जातींचादेखील वापर केला जात आहे. इतर पिकांसह उसाची लागवड करण्यासाठी खंदक पद्धतीचा देखील वापर केला जात आहे. यातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here