बेळगाव : कॅपवाड येथील अथणी शुगर्स डिस्टिलरीस २०२४-२५ या वर्षाचा साउथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे बेस्ट डिस्टिलरी म्हणून प्लॅटिनम अॅवॉर्डने गौरविण्यात आले. तिरुपती येथे साउथ इंडियन शुगर केन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वार्षिक बैठकीत ‘एसआयएसएसटी’चे अध्यक्ष एन. चिनापन यांच्या हस्ते हा पुरस्कार अथणी शुगर्स डिस्टिलरीचे जनरल मॅनेजर किरण मुधाळे यांनी स्वीकारला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डी. व्यंकटेश्वर राव, उद्योजक लक्ष्मण निराणी उपस्थित होते. अथणी शुगर डिस्टिलरीस सलग आठव्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. अथणी साखर कारखान्यात हा पुरस्कार मुधाळे यांनी कारखान्याचे अध्यक्ष श्रीमंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील, कार्यकारी संचालक योगेश पाटील व अधिकारी आणि कामगार उपस्थित होते.