पुणे : ओंकार ग्रुपचे प्रमुख बाबूराव बोत्रे- पाटील यांना दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) यांनी आयोजित केलेल्या ७० व्या वार्षिक परिषदेत ‘उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार समारंभ पुणे येथील जे. डब्ल्यू, मॅरिऑट हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन आयोजित ७० वी वार्षिक परिषद आणि शुगर एक्स्पो २०२५ झाले. या परिषदेत साखर उद्योगात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बाबूराव बोत्रे-पाटील यांना ‘उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव ओमराजे बाबूराव बोत्रे-पाटील यांनी स्वीकारला.
पुरस्कार वितरण सोहळ्यास सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालिका डॉ. सीमा परोहा, तत्कालीन साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, संजय अवस्थी आणि एन. चिन्नप्पन आदी उपस्थित होते.