कोल्हापूर : येत्या गळीत हंगामात कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना सभासदांना एकरकमी पैसे देईल, अशी घोषणा कारखान्याचे संचालक, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली. कारखान्याच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. सभासद शेतकऱ्यांचे एकरी ऊस उत्पादन वाढावे यासाठी कारखान्यातर्फे एआय या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यासाठी इचलकरंजीच्या डीकेटीई या संस्थेचे सहकार्य घेतले जात आहे, अशी माहितीही आवाडे यांनी दिली.
कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, ‘सभासद, शेतकरी, जनतेने साथ आणि विश्वास दिल्यानेच जवाहर साखर कारखाना यशस्वीपणे उभा राहिला. साखर कारखानदारीत आज त्यामुळेच जवाहरचा नावलौकिक आहे. माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, आमदार राहुल आवाडे, स्वप्नील आवाडे, मौसमी आवाडे, वैशाली आवाडे, प्रकाश दत्तवाडे, सुनील पाटील, केन कमिटी अध्यक्ष दादासाहेब सांगावे, आण्णासाहेब शेंडूरे, आण्णासाहेब भोजे, शिवराज नाईक, दिनकरराव ससे, संचालक सूरज बेडगे, प्रकाश पाटील, अण्णासाहेब गोटखिंडे, मंगलराव माळगे, महेश पाटील आदी उपस्थित होते. राहुल आवाडे, स्वप्नील आवाडे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी सभेचे इतिवृत्त तसेच विषयांचे वाचन केले. उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांनी आभार मानले.