उत्तर प्रदेश : आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात ऊस विकासावर कार्यशाळा, नवीन तंत्रज्ञानावर भर

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी, ऊस विभागाने ‘शाश्वत विकास’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत ऊस उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे आणि ऊस उद्योगाला नवीन तंत्रज्ञानाशी जोडणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यूपीसीएसआर संचालक व्ही. के. शुक्ला, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी अजय कुमार तिवारी, मवाना शुगरचे एमडी आर. के. गंगवार आणि सह ऊस आयुक्त आर. सी. पाठक यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी यात सहभाग घेतला.

यावेळी यूपीसीएसआरचे संचालक व्ही. के. शुक्ला म्हणाले की, अलिकडच्या काळात सरकार शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले मिळावीत आणि साखर कारखान्यांची क्षमता वाढावी यासाठी काम करत आहे. आतापर्यंत ३८ साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. भविष्यात ऊस लागवडीत रिमोट सेन्सिंग, एआय आणि मशीन लर्निंगचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यामुळे केवळ शेताचे निरीक्षण करणे सोपे होणार नाही तर पिकांच्या आजारांवर वेळेवर उपचार करणेदेखील शक्य होईल. भविष्यात साखर कारखाने केवळ साखर उत्पादनाचे केंद्र नसून इतर अनेक संबंधित उत्पादनांचे केंद्र बनतील. वरिष्ठ वैज्ञानिक अजय कुमार तिवारी यांनी शेतकऱ्यांना शेतात खतांचा अतिवापर करू नये, असे आवाहन केले. त्यांनी ऊस पिकांवर होणाऱ्या लाल सड रोगाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. लाल सड रोगामुळे उसाच्या को-२३८ जातीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी रोगामुळे आणि उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळे त्याची लागवड टाळत आहेत असे सह ऊस आयुक्त आर. सी. पाठक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here