कोल्हापूर : भारतीय शुगर या साखर उद्योगातील देशपातळीवरील अग्रेसर संस्थेच्या व्हाईस प्रेसिडेंट (व्यवस्थापन) पदी हुपरी (ता. हातकणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर गोपाळ जोशी यांची फेरनिवड करण्यात आली.
रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत देशभरातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांचे पदाधिकारी, तांत्रिक सल्लागार तसेच मशिनरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी फेरनिवड झाल्याबद्दल जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मनोहर जोशी हे सलग 40 वर्षे कार्यकारी संचालक म्हणून उत्तम व्यवस्थापन करत आहेत. या कालावधीत त्यांनी कारखान्याची ऊस गाळप क्षमता १६ हजार मेट्रिक टनांपर्यंत करून २७ मेगॅवॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पही कार्यान्वित केला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते जोशी यांना या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भारतीय शुगर संस्थेचे प्रेसिडेंट विक्रमसिंह शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह शिंदे उपस्थित होते.