इरोड : गुरुवारी रात्री बारगुर घाट रोडवर म्हैसूरहून तंजावरला ३५ टन साखर घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला आग लागली.
पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास, जेव्हा ट्रक थमरैकराईजवळील पहिल्या हेअरपिन बेंडजवळ आला, तेव्हा इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. चालक आणि त्याच्या मदतनीसाने धावपळ करून पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. यांदरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्यांनी अंतीयुर अग्निशमन केंद्राला माहिती दिली. अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत ट्रक आगीत पूर्णपणे जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
यांदरम्यान, उष्णतेमुळे साखर वितळली आणि रस्त्यावर पसरली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. हा सर्व कचरा हटवल्यानंतरच कर्नाटक आणि तामिळनाडूला जोडणारा रस्ता पुन्हा सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आग जंगलात पसरू नये म्हणून परिसरातील झाडां-झुडुपांवर पाणी ओतण्यात आले. शुक्रवारी घाट रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली.