सोलापूर : ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे- पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे – पाटील व संचालक ओमराजे बोत्रे – पाटील यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार संभाजीराव पाटील- निलंगेकर, नामदार दादा भुसे, यामिनी पाटील यांच्या उपस्थितीत ही रक्कम प्रदान करण्यात आली. शेतकऱ्यांच्या संकट काळात ओंकार ग्रुपने मोलाची मदत केली आहे.
याबाबत चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. समाजाप्रती जबाबदारी म्हणून ही मदत रक्कम देणे हे आमचे कर्तव्य समजतो. ओंकार ग्रुप सदैव शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध आहे. ओंकार ग्रुपने यापूर्वीही शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकासासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. आताही पूरग्रस्तांना मदतीचा हा दानशूरतेचा उपक्रमही त्याच सामाजिक संवेदनशीलतेचा एक भाग आहे.