सांगली : पूर्वी साखर कारखाने १६० ते १८० दिवस चालत. शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागे. सध्या ऊस उत्पादनात २० टक्क्यांहून अधिक घट झाल्यामुळे हंगाम १०० दिवसांवर आला आहे. ऊस तोडीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. तरीही आम्ही ऊस तोडणी कार्यक्रमात अचूकता आणत सुधारणा करीत आहोत. या हंगामापासून ऊस कधी तुटणार आहे, याची माहिती शेतकऱ्यांला मोबाईलवर आधीच देण्याची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली. रेठरेहरणाक्ष, दुधारी व बिचूद येथील ऊस उत्पादक सभासद संपर्क दौऱ्यात ते बोलत होते.
पाटील यांनी शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्व ऊस साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. संचालक बाळासाहेब पवार म्हणाले, “प्रतीक पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजावून घेऊन ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालवला आहे. गेल्या दोन वर्षांत कारखान्याने शेतकरीहिताच्या विविध योजना आणल्या आहेत. यावेळी ज्येष्ठ नेते बी. डी. पवार, दादासाहेब मोरे, सचिव डी. एम. पाटील, जल सिंचन अधिकारी जे. बी. पाटील, रेठरेहरणाक्ष येथील जे. डी. मोरे, सुजित मोरे, धनाजी बिरमुळे, उमेश पवार, विश्वजित पाटील, दिलीप मोरे, जयवंत मोरे, नीलेश पवार, संजय मोरे, चंद्रहार पवार, हणमंत मोरे, संदीप जाधव, जयसिंग मोरे, दुधारी येथे आनंदराव लकेसर, सरपंच नागेश कदम, सागर पाटील, विश्वास पाटील, आनंदराव कदम, जीवन कदम, बिचूद येथे हरिभाऊ सावंत, अशोक पाटील, चंद्रकांत मोहिते, प्रकाश पाटील, दिलीप सावंत, प्रदीप गोडसे, बाजीराव रसाळ आदी उपस्थित होते.