रुरकी : उत्तराखंड किसान मोर्चाच्यावतीने येथे भव्य महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महापंचायतीसाठी विविध ठिकाणांहून शेतकरी नेत्यांचे आगमन झाले आहे. स्मार्ट मिटरला विरोध आणि साखर कारखान्यांनी थकवलेली ऊस बिले हे दोन प्रमुख मुद्दे मांडण्यात आले आहेत.
गुरुवारी किसान मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ट्रॅक्टरवरून रुरकी येथे आले. त्यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ महापंचायत सुरू केली. या विभागातील शेतकरी राज्य सरकारने बसविलेल्या स्मार्ट मीटरचा निषेध करत आहेत. याच बरोबर साखर कारखान्यांनी थकवलेली ऊस बिले तातडीने दिली जावीत, शेतकऱ्यांच्या थकीत बिलांकडे सरकारने प्राधान्याने लक्ष द्यावे आणि कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.