सोलापूर : लवंगी येथील भैरवनाथ शुगरने संस्थापक प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने ११ वा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. कारखान्याने आजपर्यंत ज्या विश्वासार्हतेवर गळीत हंगाम पूर्ण केले आहेत, त्याच विश्वासावर चालू गळीत हंगाम पूर्ण होईल. कारखान्याचे यंदा सहा लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. ते आम्ही निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास भैरवनथ उद्योग समुहचे चेअरमन अनिल सावंत यांनी व्यक्त केला. कारखान्याचा १२ वा गळीत हंगामाचा शुभारंभ बाळकृष्ण माउली मंदिर नंदेश्वरचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते बॉयलर पूजन करून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला भैरवनाथ उद्योग समूहाचे व्हा. चेअरमन केशव सावंत, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा उपस्थित होते. माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, दामाजी कारखान्याचे व्हा. चेअरमन तानाजी खरात, संचालक बसवराज पाटील, चंद्रशेखर कोंडुभैरी, मुजफ्फर काझी, सचिन नकाते, माउली काळे, सुधीर भोसले, राजकुमार पाटील, तुकाराम भोजने, भीमराव मोरे, संतोष रंधवे, साहेबराव पवार, अनिल पाटील, दादासाहेब पवार, शिवशंकर कवचाळे, संगीता कट्टे आदी उपस्थित होते.