पुणे : एनसीडीसी आठ सहकारी साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करणार असल्याची अजित पवार यांची माहिती

पुणे : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत (एनसीडीसी) केंद्र सरकारला देशातील १५ सहकारी साखर कारखान्यांना साखरेव्यतिरिक्त विविध १२ ते १५ प्रकारचे उपपदार्थ तयार करणाऱ्या प्रकल्पासाठी अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करणार आहे. यातील सात ते आठ कारखाने महाराष्ट्रातील असतील असे सूतोवाच केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी शिर्डी दौऱ्यावेळी केली आहे. एनसीडीसीने चार टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केल्यास कारखाने पुढे येतील असे आम्ही केंद्र सरकारला सूचवले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित होते.

अजित पवार पवार म्हणाले, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकारी साखर कारखान्यांना एनीसीडीसीमार्फतच्या कर्ज पुरवठ्यातील व्याजाचा दर कमी करू शकतो, असे स्पष्ट केले आहे. बगॅस, मळीपासूनचे उपपदार्थ तयार करणारे प्रकल्प राबवायचे झाल्यास भांडवल लागते. असे प्रकल्प फायदेशीर ठरतात, हे देशातील साखर उद्योगाशी संबंधित लोकांना दाखवून द्यायचे आहे. राज्यातील चांगल्या आर्थिक सक्षम सहकारी साखर कारखान्यांची निवड या प्रकल्पात केली जाईल. दरम्यान, राज्यात ऊस शेतीत कृत्रिम बुध्दिमत्तेचा तथा एआय तंत्रज्ञानाच्या वापरासाठी शेतकऱ्यांसह कारखान्यांनीही धाडस करण्याची गरज आहे. साखर कारखान्यांनी उसामध्ये १०० टक्के एआय तंत्रज्ञान वापरावे. आपण आपल्या उसामध्ये ७० पैकी ६५ एकर क्षेत्रावर याचा वापर केला आहे, अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here