बिजनौर : बखराबाद उई खटाई येथील शेतकऱ्यांनी भाकियू अराजकीयच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना १२० पोस्टकार्डे पाठवली आहेत. सरकारने उसाचा दर ५०० रुपये करावा आणि बिजनौरहून गंगा एक्सप्रेस वे याबाबतच्या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. भारतीय किसान युनियन (अराजकीय)च्या न्याय पंचायतीचे अध्यक्ष राजीव त्यागी आणि गावाध्यक्ष गौरव कुमार प्रजापती यांच्या नेतृत्वाखाली बाबराबाद उई खटाई गावातील शेतकऱ्यांनी सोमवारी, गावातील पोस्ट ऑफिसमधून १२० पोस्टकार्डे खरेदी केली. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना १२० पोस्टकार्डे लिहिली आहेत.
गंगा एक्सप्रेस वे बिजनौर जिल्ह्यातून जावा आणि उसाचा दर ५०० रुपये प्रती क्विंटल करावा अशी मागणी केली. आगामी काळात या मागणीचा पाठपुरावा केला जाईल असे भाकियूच्या न्याय पंचायतीचे अध्यक्ष राजूव त्यागी, गौरव कुमार प्रजापती यांनी सांगितले. यावेळी राकेश त्यागी, मुनीश त्यागी, धनंजय त्यागी, हरिराज त्यागी, आदित्य त्यागी, गिरीश त्यागी, सुरेश शर्मा आदी उपस्थित होते.