अहिल्यानगर : ज्ञानेश्वर कारखान्याकडून १७ कोटी बँकेत वर्ग : अध्यक्ष नरेंद्र घुले यांची माहिती

अहिल्यानगर : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासद व बिगर सभासदांचे मुदत ठेव व ऊस बिलातील ठेवीवरील व्याज, तसेच कामगार बोनस, अशी एकूण १६ कोटी ४५ लाख रुपये बँकेत वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांनी दिली.

घुले म्हणाले, दीपावली सणानिमित्त कारखाना सभासद व बिगर सभासदांचे मुदत ठेव व ऊस बिलातील ठेवीवरील व्याज रक्कम नऊ कोटी ४२ लाख व कारखाना कामगार दिवाळी बोनस व इतर देय रक्कम सात कोटी चार लाख, असे एकूण १६ कोटी ४५ लाख रुपये बँक खात्यावर जमा करण्यात आली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणासाठी ही रक्कम उपलब्ध झाल्याने नेवासा-शेवगाव तालुक्यातील शेतकरी व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here