बेळगाव : राज्यसभा माजी सदस्य, केएलई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, शिवशक्ती साखर कारखान्याचे प्रवर्तक डॉ. प्रभाकर कोरे आणि राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ नवी दिल्लीचे संचालक, केएलई संस्था व चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमित कोरे याच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती शुगर्सच्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. यंदाच्या ऊस गाळप हंगामात शिवशक्ती शुगर्स साखर कारखान्याचा विक्रमी साखर उत्पादनाचा संकल्प असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी दिली. सौंदत्ती (ता. रायबाग) येथील कारखान्यात यंदाच्या गाळप हंगामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
उसाचे व बैलगाडींचे पूजन झाले. मान्यवरांनी गवाणीत उसाची मोळी टाकून गाळप हंगामाचा प्रारंभ केला. यावेळी चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक भरतेश बनवणे, अजितराव देसाई, भरमगौडा पाटील, चेतन पाटील, मल्लाप्पा म्हैशाळे, महावीर कात्राळे, अण्णासाहेब इंगळे, माजी संचालक रामचंद्र निशाणदार, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, शिदगौडा मगदूम, अप्पासाहेब पोळ, पिंटू हिरेकुरबर, बी. ए. पाटील, एम. एस. मुल्ला, मुरली राजानुगम, पांडू बडगनावर, केशव प्रसाद, संजय यादव, विजय पाटील, बी. एस. मुधोळ, एस. बेळसे, सतीश पाटील, सदाशिव निपाणी यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे सभासद, नागरिक उपस्थित होते.