अहिल्यानगर : वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कारखान्याचे संचालक नारायण काकडे, नंदा काकडे उभयतांच्या हस्ता बॉयलर अग्निप्रदीपन गुरुवारी संपन्न झाले. यावेळी यंदा कारखान्याने यंदा सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत आपला साखर कारखाना स्पर्धात्मक दर देईल, असे आश्वासन आमदार मोनिका राजळे यांनी दिले.
कामगारांनी दिवाळी बोनसमधील एक टक्का रक्कम व एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिल्याबद्दल कामगार संघटना पदाधिकाऱ्याचा सन्मान राजळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ऊसतोड वाहतूक कामगार विमा धनादेशाचे वितरण झाले. कामगार नेते नितीन पवार म्हणाले, वृद्धेश्वर उद्योग समुहाने ही सामूहिक सांघिक भावना कायम जपली आहे. दुष्काळाशी कायम दोन हात करीत सहकारी पद्धतीने गेली चाळीस वर्षे वृद्धेश्वरची वाटचाल आहे. पंधरा टक्के बोनस पैकी एक टक्का व एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याची कामगार,अधिकाऱ्यांची माणूसकी ठळक करणारी आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, कामगार नेते नितीन पवार, याप्रसंगी कार्यकारी संचालक नितीन शिंदे, उद्धवराव वाघ, अभय आव्हाड, बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, नंदकुमार शेळके, सुभाष बर्डे, बंडू पठाडे, बंडू बोरुडे, विष्णुपंत अकोलकर, भगवान आव्हाड,अमोल गर्जे, अंकुश कासुळे नारायण पालवे आदी उपस्थित होते.