कोल्हापूर : ‘यंदाचा गळीत हंगाम यशस्वितेसाठी काटेकोर नियोजन केले आहे. जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी प्रयत्न केले जातील,’ असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी केले. गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मोठ्या उत्साहात झाला. अध्यक्ष मुकुंदराव देसाई, उपाध्यक्ष सुभाष देसाई व संचालक यांच्या हस्ते अग्निप्रदीपन झाले. संचालिका मनीषा देसाई व त्यांचे पती रवींद्र देसाई यांच्या हस्ते होमहवन विधी झाला.
यावेळी ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, उदयराज पवार, जिल्हा बँकेचे प्रतिनिधी सुधीर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारुती घोरपडे, अनिल फडके, रणजित देसाई, दीपक देसाई, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, रचना होलम, काशीनाथ तेली, हरी कांबळे, रशीद पठाण, दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, जनरल मॅनेजर (टेक्निकल) एम. आर. पाटील, चिफ केमिस्ट सुजय देसाई, मुख्यशेती अधिकारी विक्रमसिंह देसाई, प्रकाश चव्हाण, कामगार संघटनेचे अध्यक्ष धनाजी किल्लेदार, विविध संस्थांचे प्रतिनिधी, ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.