सांगली : दालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज युनिट निनाईदेवी साखर करूंगली (ता. शिराळा) कारखान्यातर्फे यंदाचा १५.५० टक्के दिवाळी बोनस जाहीर करण्यात आल्याची माहिती युनिट हेड संजीव देसाई यांनी दिली. कारखाना प्रशासनाने नेहमीच शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले.
देसाई म्हणाले की, साडेचार लाख टनांच्या आसपास गाळप करण्यात आले. कामाची पोचपावती व उत्कृष्ट नियोजनासाठी बोनस असल्याचे त्यांनी सांगितले. हंगाम २०२५-२६ मध्ये देखील कर्मचाऱ्यांनी मन लावून हंगाम यशस्वितेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. चालू हंगामात सहा लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट आहे. युनियनमार्फत युनिट हेड संजीव देसाई यांचा सत्कार करण्यात आला. एच. आर. हेड महेश कवचाळे, उपव्यवस्थापक सुधीर पाटील, रणधीर चव्हाण, राजेंद्र नाईक उपस्थित होते.