कोल्हापुरी गुळाला मुहूर्ताला ५०५० रुपये दर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर काढलेल्या सौद्यात गुळाला प्रतिक्विंटल ५०५० रुपये भाव मिळाला. त्याचबरोबर यंदा भाजीपाला मार्केटमध्ये मुहूर्ताचा सौदा काढण्यात आला, यामध्ये कोथिंबीरला शेकडा २१०० रुपये भाव मिळाला. ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते दोन्ही सौदे काढण्यात आले. बाजार समितीत दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सौदे काढले जातात. यंदा, अमर पाटील यांच्या अडत दुकानापासून बुधवारी सौद्याला सुरुवात झाली. यामध्ये प्रतिक्विंटल ३७०० ते ५०५० रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला.

फळे-भाजीपाला मार्केटमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या संतोष ट्रेडिंग कंपनी दुकानात कोथिंबीरचा सौदा काढण्यात आला. यावेळी ‘बिद्री’ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, ‘गोकुळ’चे संचालक प्रा. किसन चौगले, सभापती सूर्यकांत पाटील, संचालक भारत पाटील-भुयेकर, ॲड. प्रकाश देसाई, संभाजी पाटील-कुडिनेकर, सुयोग वाडकर, कुमार आहुजा, शंकर पाटील, पांडुरंग काशीद, बाळासाहेब पाटील, शेखर देसाई, दिलीप पोवार, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील यांच्यासह व्यापारी, अडते, शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here