सातारा : श्री दत्त इंडिया कारखाना १२ लाख मे. टन गाळप करणार – अजितराव जगताप

सातारा : साखरवाडी (ता. फलटण) येथील श्री दत्त इंडिया या साखर कारखान्याचे २०२५-२६ च्या हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने कारखान्याची यंत्रणा सज्ज आहे. ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा करार झाले आहेत. मागील पाच हंगामांमध्ये शेतकऱ्यांना वेळच्या वेळी दिलेल्या चोख ऊस पेमेंटमुळे यंदा १२ लाख मेट्रिक टन गाळप होण्यात अडचण येणार नसल्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले. जगताप म्हणाले, मागील हंगामापासून कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून, दैनंदिन ८ हजार ५०० क्षमतेने गाळप होणार आहे. कारखान्याने प्रत्येक वर्षी स्पर्धात्मक ऊस दर आणि वेळेत पेमेंट केले आहे. शासन निर्णयानुसार गाळप सुरू करण्यात येणार आहे. गाळप क्षमता वाढल्याने शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप करता येणार आहे. फलटण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस या कारखान्यास घालावा.

साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया प्रा. लि. साखर कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि गव्हाणीचे पूजन फलटण येथील श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्यामसुंदरशास्त्री विद्वांस, श्री दत्त इंडियाचे संचालक चेतन धरू, अजितराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ इंजिनिअर अजित कदम, डेप्युटी चीफ इंजिनियर नितीन रणवरे, असिस्टंट जनरल मॅनेजर नितीन नाईक नवरे, को-जन मॅनेजर दीपक मोरे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, सिनियर इन्स्ट्रूमेंट इंजिनिअर नितीन सुद्रिक, एच. आर. सुहास भुसनर, डेप्युटी चीफ इंजिनिअर किशोर फडतरे फडतरे, सुरक्षा अधिकारी अजय कदम, पै. संतोष भोसले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, सुहास गायकवाड, केन सुपरवायझर एस. के. भोसले, ट्रान्सपोर्ट इनचार्ज नितीन भोसले, शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here