कर्नाटक : हल्याळच्या कृष्णा कारखान्यावर लक्ष्मण सवदी समर्थक शेतकरी सहकारी पॅनेलचे वर्चस्व

अथणी : तालुक्यातील हल्याळ येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. एकूण १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण सवदी समर्थक शेतकरी सहकारी पॅनेलने दणदणीत विजय मिळविला. सर्व जागा जिंकून सवदी गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. तर निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावलेल्या रमेश जारकीहोळी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पॅनेलचा पराभव झाला. कारखान्याच्या सभासदांनी पुन्हा एकदा आमदार लक्ष्मण सवदी, आमदार राजू कागे यांच्या नेतृत्वाखालील माजी अध्यक्ष पराप्पा सवदी यांच्या पॅनेलला भरघोस मते दिली.

या कारखान्याच्या निवडणुकीत एक जागा बिनविरोध निवडली गेली होती. ही जागाही सवदी गटाच्या उमेदवाराने जिंकली आहे. उर्वरित १२ जागांसाठी चुरशीने निवडणूक झाली. काँग्रेस, भाजप, धजदच्या नेत्यांनी एकत्र येत रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. मात्र, सवदी यांनी आपले वर्चस्व राखले. रविवारी रात्री उशिरा मतमोजणी झाली. दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकृत निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. प्राथमिक आकडेवारीनुसार सवदी गट मोठ्या फरकाने विजयी झाला आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here