कोल्हापूर : आंदोलन अंकुश संघटनेतर्फे शेतकऱ्यांसाठी ऊसतोड यंत्र, वाहतूक सुविधा

कोल्हापूर : आंदोलन अंकुश संघटनेने खुद्द ऊसतोड यंत्र मशीन सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या प्रयोगामुळे शिरोळ तालुक्यातली दत्त साखर कारखान्याच्या १० किलोमीटरच्या परिघात असणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाची वेळेत तोडणी होणार आहे. संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या संकल्पनेतून या क्रांतिकारी प्रयोगाची सुरुवात करण्यात आली आहे. या मालक ऊस तोड प्रयोगात शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडायचा, संघटनेच्या शुगर लोडरने तो वाहनात भरला जाईल. संघटनेचे वाहतूकदार या उसाची वाहतूक कारखान्यापर्यंत करतील. यातून शेतकऱ्यांना उसाला ३९०० रुपये प्रतीटन दर मिळू शकेल. कारखान्याच्या कार्यक्षेत्राजवळील शेतकऱ्यांचे जादा तोडणी, वाहतूक दरामुळे होणारे नुकसान यामुळे थांबेल असा विश्वास चुडमुंगे यांनी व्यक्त केला.

आंदोलन अंकुश संघटनेने शेतकरी वजन काट्यानंतर हा दुसरा प्रयोग केला आहे. याची माहिती देताना चुडमुंगे म्हणाले की, शुगर के लोडरने शेतकऱ्यांनी तोडून टाकलेला ऊस वाहनात भरला जाणार आहे. हा लोडर कोईमतूर येथील प्रथितयश बुल कंपनीकडून तयार करून घेतला आहे. लोडर ट्रॅक्टरवर फिट करण्यात आला असून, हा लोडर दिवसात १०० टन ऊस भरण्याची क्षमता असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणाऱ्या या प्रयोगाला शेतकऱ्यांची साथ मिळणार आहे. मजूर टंचाईवर हा प्रयोग उत्तर ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here