अहिल्यानगर : अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ३२ व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आणि गळीत हंगामाचा प्रारंभ आज आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आला. कारखाना या वर्षी साडेतीन लाख टन उसाचे गाळप करणार आहे. तसेच, उसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील-गायकर यांनी केली.
ते म्हणाले, यावर्षीचा गळीत हंगाम सर्वांत अडचणीचा आहे. हंगाम करण्यासाठी चाळीस कोटी रुपयांची गरज होती. बँकेकडून फक्त बारा कोटी रुपये मिळाले. मात्र, तालुक्यातील संस्था आणि कारखान्याशी संबंधित व्यापाऱ्यांकडून मदत मिळाल्याने हा गळीत हंगाम निर्विघ्नपणे पार पडेल, असे ते म्हणाले. आमदार गायकर म्हणाले की, कारखाना जोपर्यंत आमच्या ताब्यात आहे, तोपर्यंत कोणत्याही स्थितीत बंद पडू दिला जाणार नाही. योगी केशवबाबा, कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाश मालुंजकर, माजी उपाध्यक्ष गुलाबराव शेवाळे, माजी संचालक बाळासाहेब ताजणे, भाऊसाहेब ताजणे, अमृतसागर दूध संघाचे आनंदराव आवारी, बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, संचालक ईश्वर वाकचौरे उपस्थित होते.












