छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील मुक्तेश्वर साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना यावर्षी कारखान्याकडून उसाचा पहिला हप्ता ३,०५० रुपये देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हक्काच्या कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस देऊन उच्चांकी गाळप पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याच्या व्यवस्थापक मंडळाच्यावतीने ज्येष्ठ संचालक रामचंद्र निरपळ यांनी केले. कारखान्याच्या १६ व्या गळीत हंगामाची सुरुवात वारकरी आश्रमाचे प्रमुख नारायणनंदगिरी महाराज, ज्येष्ठ संचालक रामचंद्र निरपळ, मुख्य शेतकरी अधिकारी नंदकुमार कुंजर, रसायनतज्ज्ञ पंडित गोरडे, मुख्य अभियंता दिगंबर अडकिने, अभियंता प्रमोद काळे, हिशोबनीस रामेश्वर म्हस्के, माजी सरपंच गोरखनाथ शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ताराचंद दुबिले यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमात नंदकुमार कुंजर यांनी प्रास्ताविक केले. राहुल ढोले यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष कुंदे, किरण सरोदे, प्रशासकीय अधिकारी सखाराम मोरे, राजेंद्र शेळके, विनोद इथापे, विठ्ठल टेके, ताराचंद शिंदे, विठ्ठल काळे, सचिन उबाळे, विष्णू शेळके, किरण वालतुरे, गणेश नवले, रायभान शिंदे, गणेश विधाटे, नारायण काळे, पंढरीनाथ पाठे, गणेश पदार, दत्ता राऊत, भाऊसाहेब म्हस्के, संभाजी गायकवाड, किशोर नरवडे, अशोक निकम, लक्ष्मण निकम, जयराम दुबीले, धीरज शेवगण, संतोष नरवडे, दीपक टेके, मंगलसिंग ठाकूर, दादा शेळके, कल्याण शेळके आदी उपस्थित होते.











