लातूर : वैशालीनगर-निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नि प्रदीपन शुक्रवारी चेअरमन वैशाली देशमुख यांच्या हस्ते झाले. तसेच नवीन हार्वेस्टरचे पूजनही करण्यात आले. यंदाच्या गळीत हंगामात उच्चांकी उसाचे गाळप आणि उच्चांकी साखर उतारा मिळवण्यासाठी साखर कारखाना प्रशासनाने सज्ज रहावे. कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र पाहता हंगाम यशस्वीपणे पार पडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे ८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उदिष्ट साध्य होईल असा विश्वास चेअरमन देशमुख यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात विलास साखर गणेशोत्सव मंडळाकडून कर्मचाऱ्यासाठी घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धांतील विजेत्यांना आणि कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. राहूल इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक श्याम बरुरे यांनी आभार मानले. व्हाइस चेअरमन वैजनाथ शिंदे, ट्वेन्टीवन शुगर्सचे व्हाइस चेअरमन विजय देशमुख, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक आत्माराम पवार, संचालक रवींद्र काळे, अमृत जाधव, सतीश शिंदे, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, नितीन पाटील, रंजीत पाटील, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, हणमंत पवार, नेताजी साळुंके, रामराव साळुंके, दिपक बनसोडे, लताबाई देशमुख, श्याम बरुरे, सुभाष माने, रमेश देशमुख उपस्थित होते.












