सोलापूर : ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांत बोत्रे-पाटील यांच्या हस्ते पहिल्या २५००५ साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी बोत्रे-पाटील म्हणाले की, ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनखाली व २०२६ या गळीत हंगामात आधिकारी व कर्मचारीवर्ग यांनी नियोजन केले.
ते म्हणाले, सुरुवातीपासून नवीन व जुना कारखाना पूर्ण क्षमतेने चालू आहे. उप पदार्थ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे परिसरातील संपूर्ण उसाचे नियोजनबद्ध गाळप केले जाईल. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला परिपक्व ऊस ओंकार साखर कारखान्याला घालावा, असे आवाहन बोत्रे-पाटील यांनी केले. यावेळी जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे, तानाजीराव देवकते, समाधान गायकवाड, मेजर मोहन घोडके, शरद देवकर, नीलेश गुरव, रमेश औताडे, ऊस उत्पादक शेतकरी रामभाऊ मगर, नितीन जाधव उपस्थित होते.












